मराठी हिन्दी English

फोन नं. +९१-२५९४-२३३२१५
+९१-२५९४-२३४२५१

ट्रस्ट विषयी

आद्य ज्योर्तिलिंग श्री त्र्यंबकराजाची त्रिकाल पूजा नैवेद्य तसेच वर्षभर होणारे सन व उत्सव यांची व्यवस्था पाहण्याचे काम श्री. त्र्यंकबेश्वर संस्थान करत असते. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी याकरिता नारो दामोधर जोगळेकर यांची संस्थानाचे कारभारी म्हणून नेमणुक केली. व याकरिता आवश्यक असेल्या खर्चाची तजवीज करून ठेवली. पुढे ब्रिटीश राजवटीत देखील ही परंपरा चालू राहिली. सध्या शासनाकडून संस्थानाला नाममात्र अनुदान मिळत असते. या सर्व व्यवस्थेसाठी :- ३ त्रिकाल पुजक, २ ब्रम्हगिरी पर्वताची प्रदशिणा करणारे, १ देवापुढे पुराण सांगणारा, १ किर्तन करणारा व रोज आरती करणारा हरीदास, १ अवांतर देवांचे पूजन करणारा, १ गंगेस एकादशनी करणारा, ६ शार्गिद, २ आचारी, २ कारकून, १ कोठवळा सरदार व त्याचे हाताखाली १ मुलगा, १ सबनीस व १३ शिपाई, पालखी करिता ४ भोई, १ अबदागिरीवाला, १ मशालजी, १ बेल आणण्याकरिता, १ चोपदार, १ शंख वाजवणारा जंगम, ३ घडयाळजी, १ गोलंदाज नगारखान्याकडे, ४ सनईवाले, २ सुरकरी, २ कर्णेकरी, २ नगारजी व १ दमामी म्हणजे मोठा नगारा वाजविणारा, १ झांझी, १ हरकाम्या, २ बागेकरिता माळी, १ कामाठीण व १ त्र्यंबकेश्वर देवळापासून कुशावर्त तीर्थापर्यंत रस्ता झाडून स्वच्छ करणारा. याप्रमाणे माणसे नेमलेली होती. या सर्वांकडून नेमून दिलेली कामे करवून घेण्याची जबाबदारी कारभारी लोकांची असते.

देवाचे लवाजम्यात २ पालख्या, १ रत्नजडित मुकूट पूर्वी म्हैसुरच्या राजाजवळ होता. तेथुन मोगलांनी दिल्लीला नेला. पुढे भाऊसाहेब पेशव्यांनी आणून देवास अर्पण केला. १ रथ श्रीमंत रघुनाथराव विठ्ठल दाणी विंचूर संस्थानाचे मालक यांनी कार्तिक शु. ७ शके १७८७ रोजी देवास अर्पण केला. कलग्या, शिरपेच तुरे, मोत्यांचे चौकडे, मोत्याचे कंठे इत्यादी अनेक मौल्यवान दागिने, १ छत्र, २ चामरे, २ चवरया, ४ मोरचेले, २ अबदागिरी उंची वस्त्रे तसेच पुजेची व नैवेद्याची चांदीची भांडी अशा प्रकारच्या जिनसा आहेत.


श्रीमंत श्री बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांपासून जोगळेकर घराण्यातील व्यक्तींनी श्री. त्र्यंबकेश्वर संस्थानाचे कारभारी म्हणून खालीलप्रमाणे कामकाज केले.


नं. नांव सन
१. श्री. नारो दामोदर जोगळेकर १७५२
२. श्री. माधव हरी जोगळेकर १७५२
३. श्री. विसाजी त्र्यंबक जोगळेकर १८०१
४. श्री. दामोदर गोविंद जोगळेकर १८२३
५. श्री. काशिनाथ त्र्यंबक जोगळेकर १८२३
६. श्री. नारायण काशिनाथ जोगळेकर १८३४ ते १८९८
७. श्री. माधवराव नारायण जोगळेकर १८९८ ते १९५९
८. श्री. हनुमंत माधवराव जोगळेकर १९५९ ते १९७६

१९५४ साली या संस्थानची नोंद सार्वजनिक विश्वस्त नोंदणी अधिनियमातंर्गत करण्यात आली. श्री. हनुमंत माधवराव उर्फ बबनसाहेब जोगळेकरानंतर जोगळेकर घराण्याने वारसा हक्काने चालत आलेल्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला व श्री. प्रभाकर रामचंद्र गोखले यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली. त्यांनी १९९५ पर्यंत सोल ट्रस्टी म्हणून संस्थानाचे कामकाज बघितले. श्री. प्रभाकर रामचंद्र गोखले यांच्यासमवेत सन १९८१ ते १९९५ पर्यंत श्री. विश्वासराव त्र्यंबकराव धारणे हे सोल ट्रस्टी पदावर कार्यरत होते.

१९९५ पासून विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. त्याचे चेअरमनपदी मा. जिल्हा न्यायाधिश यांनी नियुक्त केलेले न्यायाधिश काम बघतात. तसेच सचिव म्णून त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काम बघतात. यांचे बरोबर गावातील प्रतिष्ठीत श्री. रामरतन पुनमचंद सारडा, श्री. दामोदर पुंडलिक अडसरे, व श्री. मुरलीधर पुजांजी पवार या तीन व्यक्तिंनी विश्वस्त म्हणून काम केले.

दि. १२ ऑक्टोंबर २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नऊ लोकांचे विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. यामध्ये चेअरमन हे मा. जिल्हा न्यायाधिशांनी नियुक्त केलेले न्यायाधिश तसेच सचिव म्हणून त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तुंगार ट्रस्टचा प्रतिनिधी, पुरोहित संघाचा प्रतिनिधी, पुजकांचा प्रतिनिधी व धर्मदाय आयुक्त यांनी नेमलेले चार भाविकांचे प्रतिनिधी आहे.


विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांची कारकीर्द

नं. नांव सन
१. मा. न्याय. श्री. ए. बी. पाटील दि. १ एप्रिल १९९५ ते १४ जानेवारी १९९६
२. मा. न्याय. श्री. व्ही. व्ही. पळनीटकर दि. १४ जानेवारी १९९६ ते २० जुलै १९९७
३. मा. न्याय. श्री. अनिल. द. कुलकर्णी दि. २० जुलै १९९७ ते ५ जुन २००१
४. मा. प्रभारी. श्री. एन. डी. बुराडे दि. ५ जुन २००१ ते ८ सष्टेंबर २००१
५. मा. न्याय. श्री. ए. पी. कुर्‍हेकर दि. ८ सष्टेंबर २००१ ते २ जुन २००३
६. मा. प्रभारी. श्री. एन. डी. बुराडे दि. २ जुन २००३ ते २६ जुन २००३
७. मा. न्याय. श्री. एस. एल. पैठण दि. २६ जुन २००३ ते ८ सप्टेंबर २००३
८. मा. न्याय. श्री. एस. एल. पाठक दि. ८ सप्टेंबर २००३ ते २४ मे २००७
९. मा. न्याय. श्री. आशुतोष नी. करमरकर दि. २४ मे २००७ ते २ जुन २००८
१०. मा. न्याय. श्री. के. डी. बोचे दि. २ जुन २००८ ते २० जुन २०११
११. मा. न्याय. श्री. अनिल. एन. खडसे दि. २० जुन २०११ ते ९ जुन २०१४
१२. मा. न्यायाधीश श्रीमती नेहा यू. कापडी दि. ३ जुन २०१४ ते १२ सप्टेंबर २०१४
१३. मा. न्यायाधीश श्री व्ही.ए. दौलताबादकर दि. १२ सप्टेंबर २०१४ ते २० सप्टेंबर २०१५
१४. मा. न्यायाधीश श्रीमती यु. एस. जोशी-फाळके दि. २४ सप्टेंबर २०१५ ते २९ मार्च २०१७
१५. मा. न्यायाधीश श्री पी. के. चिटणीस दि. ३० मार्च २०१७ ते ३१ ऑगस्ट २०१७
१६. मा. न्यायाधीश श्री. एम. एस. बोधनकर दि. ०१ सप्टेंबर २०१७ ते आजतागायत

माननीय सर्वौच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ

नं. विश्वस्त सन
१. अध्यक्ष श्री. एम. एस. बोधनकर, जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक
२. सचिव श्री. संजय प्रकाश जाधव, मुख्याधिकारी, त्रिंबक नगर परिषद
३. विश्वस्त श्री. दिलीप बाजीराव तुंगार, तुंगार ट्रस्ट प्रतिनिधी
४. विश्वस्त डॉ. श्री. सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल, पूजक प्रतिनिधी
५. विश्वस्त श्री. प्रशांत विनायक गायधनी, पुरोहित संघ प्रतिनिधी
६. विश्वस्त सौ. तृप्ती पंकज धारणे, भाविक प्रतिनिधी
७. विश्वस्त श्री. संतोष सदाशिव कदम, भाविक प्रतिनिधी
८. विश्वस्त अँड. श्री. पंकज नंदलाल भुतडा, भाविक प्रतिनिधी