मराठी हिन्दी English

फोन नं. +९१-२५९४-२३३२१५
+९१-२५९४-२३४२५१

देवस्थान उत्सव

श्री त्र्यंबकराजांच्या तिनही पूजेबद्दल

श्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे ३५० वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा - अर्चन - तांत्रिक पध्दतीनुसार अखंडितपणे चालु आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारची त्रिकाल तांत्रिक - अर्चन - पूजा अन्य कोठेही होत नाही. ही पूजा श्री त्र्यंबकेश्वर येथेच होते. हे श्री त्र्यंबकेश्वरचे एक वेगळे खास वैशिष्टय समजले जाते.

ह्या पूजा कौल संप्रदायानुसार अतिप्राचीन काश्मिरी शैवागम शास्त्रानुसार परंपरेने चालत आलेल्या असून या पूजा पध्दतीचा मुठ उगम काश्मिरमध्ये झाला आहे. इ.स. पूर्व सुमारे २००० वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे. यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल. शिव आणि शक्ति यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा ह्या उपासनेचा मुख्य उद्देश आहे. या साधनेत शिवोभुत्वा शिवंयजेत म्हणजेच साधक स्वत: शिवरुप होऊन स्वत:चीच परमेश्वर म्हणून पूजा करून घेत असतो.

वसुगुप्त नावाच्या परम शिवभक्ताला श्री. शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शीलेवर ज्ञान असल्याचे सांगितले. तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असतांना त्यांना शीलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान आज स्पंद करिका म्हणून प्रसिध्द आहे. हेही ज्ञान याच कौल संप्रदायातील असुन या स्पंद कारिकेमध्ये आध्यात्मशास्त्राचे अत्यंत गुढ असे ज्ञान दिलेले आहे. जिज्ञासूंनी जरूर स्पंद करिकेचा अभ्यास करावा.

पेशवे काळापासून पेशव्यांनी ह्या त्रिकाल पूजा चालू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली, व ह्या पूजा अखंडित चालू राहण्यासाठी व्यवस्था लावली. पेशव्यानंतर इंग्रंज सरकार व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह.या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे चालू आहेत. ह्या पूजेमध्ये प्रात:काळची पूजा दशपुत्रे घराणे, माध्यान्ह काळची पूजा शुक्ल घराणे व संध्याकाळची पूजा तेलंग घराणे यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. ह्या पूजेमध्ये तिनही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण, महाशिवरात्री, वैकुंठ चर्तुदशी इ. पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात.


संस्थानचे उत्सव


चैत्र

चैत्र पाडव्यास पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा असते. ही पूजा विश्वस्त करतात. सायंकाळी देवाची स्वारी असते. संस्थानमध्ये गुढी उभारतात. तसेच ग्रामजोशी पंचांगवाचन करतात.


वैशाख

वैशाख तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस मंदिरात असलेला हर्ष महाल उघडला जातो.


श्रावण

श्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमेस देवास पोशाख असतो. पिठोरी अमावस्येला बैलांची मिरवणूक काढली जाते.


भाद्रपद

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला विष्वस्तांकडून पार्थिव गणेश मुर्ती बसविली जाते, व मूळ नक्षत्रावर गणेश विसर्जन केले जाते.


अश्विन

अश्विन शुध्द अष्टमीस भुवनेश्वरी, कोलंबिका, निलंबिका इ. देवीस साडी, चोळी असते. विजयादशमीस शस्त्र व अवांतर देवता पुजन असते. पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा असते. सायं. ४ वाजेला देवाची स्वारी सिमोल्लंघनाकरिता निघते. नरकचतुर्थीचे दिवशी पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुन असते. लक्ष्मीपूजनाचे दिवशी सायंकाळी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.


कार्तिक

कार्तिक शु. प्रतिपदेस पाडव्याच्या दिवशी पहाटे पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुल केली जाते. सायंकाळी ५ वाजेला देवाचा सुवर्ण मुखवटा मंदिरात पिंडीवर ठेवला जातो. देवास पोशाख असतो. कार्तिक त्रयोदशी, चर्तुदशी व पौर्णिमा हे तीन दिवस किर्तन असते. वैकुंठ चर्तुदशीचे दिवशी रात्री देवाची विशेष पूजा असते. पौर्णिमेच्या दिवशी सांय. ४ वाजता श्री त्र्यंबकराजाची रथातून मिरवणूक निघते. कुशावर्त तीर्थावर पूजा असते. रथ मंदिरात परत आल्यावर सायंकाळी ७.३० वाजेला दिपमाळेची पूजा करून पेटवली जाते. हीपूजा श्री. रूईकर सांगतात.


माघ

माघ शुध्द पंचमी - वसंत पंचमीस देवास पोशाख असतो. महाशिवरात्रीचे दिवशी दुपारी ३ वाजेला देवाची पालखी संपूर्ण गावातून मिरविली जाते. रात्री १० ते १२ किर्तन असते.


फाल्गुन

फाल्गुन पौर्णिमेस होलिकापूजन केले जाते. धुलिवंदनाचे दिवशी देवास पोशाख असतो. रंगपंचमीचे दिवशी देवास रंग लावला जातो.

याप्रमाणे दर सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराची पालखीतून मिरवणूक काढून कुशावर्त तिर्थावर पूजा होत असते.